सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे “वजन व माप खाते” ही नामपध्दत बदलून “वैध मापविद्या” असे नाव दिले आहे. “वैध मापविद्या” या नावातच सूचित होते की, हे नाव वजन व माप, मापन पध्दती व मोजमाप सामग्री व लोकांचे हित सांभाळण्यासाठी विनियामक विभाग आहे. आमच्या राष्ट्रीय नेत्यांची चांगली दूरदृष्टी असल्यामुळे, वैध मापविद्येच्या आंतराष्ट्रीय संघटनेच्या शिफारसीनुसार एकरूप होऊन, ज्याचा भारत हा एक सदस्य देश आहे, संपूर्ण देशात विकसनशील व एकसारखी मॅट्रिक पध्दती अंगिकारली आहे.
वैध मापविद्या हे ग्राहक संरक्षणासाठी एक महत्वाचे अंग आहे. नागरिकांना अनुकूल प्रशासकीय सेवा प्रधान करण्यासत या विभागाची महत्वाची भूमिका आहे. वजन, माप याविषयीची सुरक्षा आणि अचूकतेच्या दृष्टीकोणासंबंधी जनहित सांभाळण्यासाठी हा विभाग तांत्रीक व वैधानिक आवश्यकतेशी संबंधित आहे.
- वजन, माप, वजन करणे व माप घेणे यांचे प्रारंभिक व वेळोवळी सत्यापन करणे.
- वैध मापविद्या अधिनियम 2009 अंतर्गत सर्व व्यापार्यांळच्या आवारांचे निरीक्षण व आकस्मिक भेट देणे (दुकाने, उद्योग, आस्थपन, किराणा इत्यादी.) कारखाने, खाणी, उद्योग, पेट्रोलियम रिटेल आउटलेट जसे वितरण पंप (डिस्पेनसिंग पंप) (पेट्रोल पंप) पेट्रोलांची टाकी असलेले वाहन, पेट्रोलांची साठवणूक करणार्याय टाक्या हे सर्व वजन व माप तपासण्यासाठी, मापण्यासाठी मॅकानिकल व विद्युत तराजू, मोजमाप साधने वितरण पंप (डिसपेनसिंग पंप), फ्लो मीटर, टॅक्सी व ऑटो रिक्षा (योग्य) मीटर, आणि सर्व तर्हेंचे पॅकेज वस्तू यांचा समावेश असेल.
- संयुक्त धाड घालणे आणि साप्ताहिक बाजाराचे निरीक्षण आणि अपराधींच्या विरोधात खटला भरणे.
- वजन, माप, वजनाच्या साधनांचे आणि मोजण्याच्या साधनांचे सत्यापन करणे.
- दुय्यम मानक,कार्यकारी मानक यांची देखरेख व वेळोवेळी सत्यापन करणे.
- निरीक्षण व आकस्मिक भेट देणे त्याचबरोबर पॅकेज वस्तूंवर वैध मापविद्येचे नियंत्रण ठेवणे.
- अपराधींच्या विरोधात खटला भरणे, गुन्हा आपसात मिटवणे आणि न्यायालयात खटला दाखल करणे.
- निर्माता आवार व पॅकींग आवारातील निव्वळ सामग्री तपासण्यासाठी, निरीक्षण व आकस्मिक भेट देण्यात निर्माता आणि पॅकेज वस्तूंचा यावर वैध मापविद्येचे नियंत्रण असेल.
- निर्माता/विक्रेता/ दुरुस्ती/विक्री यांच्या वजन, माप, वजनांच्या साधनांना आणि मोजण्याच्या साधनांना परवाना जारी करुन त्यावर नियंत्रण ठेवावे.
खात्याचे नियंत्रण खालील बाबतीत राहील.
- वजन, माप इत्यादी: वजन, माप, आणि इतर म्हणजेच सर्व प्रकारचे (मॅट्रिक) वजन, माप, वजनाची साधने आणि मोजण्याची साधने ज्यात टॅक्सी व ऑटो रिक्षांचे मीटर, वाहनकाटा, वितरण पंप (डिस्पेनसिंग पंप) (पेट्रोल पंप) साठवणूक करणार्याध टाक्या, टाक्या असलेले वाहन (वेहिकल टँक) इत्यादी यांचाही समावेश असेल.
- व्यापारी: व्यापारी हा वजन, माप व वजनाची साधने आणि मोजण्याची साधने किंवा पॅकेज वस्तूंच्या संबंधित वापरासाठी असतो.
- अपराधी: वरील उल्लेखित कायदा व अधिनियमातील तरतुदींचे जी व्यक्ती उल्लंघन करेल ती व्यक्ती अपराधी ठरेल.
- निर्माता: वैध मापविद्या अधिनियम 2009 अंतर्गत निर्मीती क्षेत्रातील व्यक्ती/मालक जो निर्माता आहे त्याने विहीत नमुन्याद्वारे खात्याला अर्ज दाखल करावा आणि त्यानंतर निर्मात्याने वजन, माप, वजन साधने आणि मोजण्याच्या साधनांचा परवाना जारी करून आवश्यक आहे.
- विक्रेता: जी व्यक्ती वजन, माप व वजन साधनांच्या आणि मोजण्याच्या साधनांशी संबधित आहे, त्या विक्रेत्याने विहीत नमुन्याद्वारे खात्याला अर्ज दाखल करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर वजन, माप, वजन साधनांच्या आणि मोजण्याच्या साधनांच्या संबंधित विक्रेत्याने खात्याकडून परवाना जारी करून घेणे आवश्यक आहे.
- दुरुस्तीकार: जी व्यक्ती वजन, माप व वजन साधनांची आणि मोजण्याच्या साधनांची दुरुस्ती करते त्या दुरुस्ती करण्यार्याने विहीत नमुन्याद्वारे खात्याला अर्ज दाखल करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर वजन, माप, वजन साधनांच्या आणि मोजण्याच्या साधनांच्या दुरुस्तीच्या कामकाजासाठी दुरुस्ती करणार्यावने खात्याकडून परवाना जारी करून घेणे आवश्यक आहे.