ग्राहकांच्या माहितीसाठी
-
- व्यापार्याद्वारे त्याच्या व्यापार, वाणिज्य व उद्योगासाठी वापरले जाणारे वजन, माप व वजन माप करण्यासाठी वापरली जाणारी सर्व उपकरणे कायद्यांतर्गत वेळोवेळी वैध मापविद्या निरीक्षकाकडून सत्यापित आणि मुद्रांकित करणे आवश्यक आहे.
- व्यापार्यांनी त्यांच्या व्यापार, वाणिज्य व उद्योगामध्ये स्वत: च्या फायद्यासाठी करण्यात आलेली हातचलाखी टाळण्यासाठी तराजू, हुक किंवा स्टेंडला लोंबकळविणे आवश्यक आहे.
- ग्राहकांनी आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी 10 ग्राम, 100 ग्राम, 500 ग्राम, 1 किलो इत्यादी अशा राउंड मेट्रीक यूनिट्समध्ये खरेदी केल्या पाहिजेत जेणेकरून हिशेब सोपा होतो.
- ग्राहकांनी पाव किलो किंवा क्वॉर्टर किलो याचा वापर टाळला पाहिजे. 200 ग्राम किंवा 200 मि.ली. अशा सारखी सोपी दशांश प्रमाण पध्दती वापरायला लावली पाहिजे.
- ग्राहकांनी किलोग्राम किंवा ग्राममध्ये दूध न घेता लीटर किंवा मिली लीटरमध्ये खरेदी करावे.
- ग्राहकांनी तराजूचे संकेत वाचायला शिकले पाहिजे आणि आपल्या खरेदीच्या वजनाचे निरीक्षण केले पाहिजे.
- ग्राहकांनी पैशाच्या किंमतीवर न जाता निश्चित प्रमाणात खरेदी करावी.
- ग्राहकांनी कोणतीही वस्तू सीर, फूट इत्यादी जुन्या मापन पध्दतीनुसार खरेदी करण्यास नकार दिला पाहिजे. हे बेकायदेशीर आहे आणि व्यापार्यां कडून फसवणूक होण्याची शक्यता असते.
- ग्राहकांनी दूध खरेदी करताना त्यांनी दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात योग्य प्रमाणात दूध मिळाले की नाही हे पाहिले पाहिजे. दूधाच्या पिशवीवरील पॅकिंगची तारीख व कमाल विक्री किंमत (एम.आर.पी.) तपासावी.
- ग्राहकांनी गोड पदार्थ, मिठाई इत्यादींची खरेदी करताना त्यांना दिल्या जाणार्याक मिठाईचे निव्वळ वजन करून देण्याचा आग्रह करावा. बॉक्सचे वजन मिठाईच्या वजनात समाविष्ट केले जाणार नाही हे बघणे आवश्यक आहे.
- पेट्रोल पंपवर योग्य प्रमाणात पेट्रोल पुरवठा होतो की नाही हे खात्यातर्फे वेळोवेळी तपासले जाते. कमी पुरवठा होत असल्याचा संशय आल्यास ग्राहकांनी त्याबाबतची तक्रार वैध मापविद्या अधिकार्यालकडे करावी.
- 12. तयार कपडे खरेदी करताना ग्राहकांनी कपड्याच्या आकाराने खरेदी न करता फक्त मीटर माप पध्दतीनुसार जसे: मीटर आणि सें.मी. ने खरेदी करावी. विविध कपडे निर्माते वेगवेगळ्या मापाचे कपडे तयार करतात, जेथे त्याला/तिला कपडे मिळू शकतात जे कदाचित त्याला/तिला योग्य बसणार नाहीत. शर्ट कॉलरच्या मापानुसार विकले जातात ज्यामध्ये 1 सें.मी.च्या अंतराने फरक असतो. उदा: 35 सें.मी., 36 सें.मी. 37 सें.मी. ईत्यादी. बनियान छातीच्या मापानुसार विकली जातात ज्यामध्ये 5 सें.मी.च्या अंतराने फरक असतो. उदा: 85 सें.मी., 90 सें.मी., 95 सें.मी. इत्यादी.
- ग्राहकांनी जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना नेहमी हेक्टर किंवा चौरस मीटरने खरेदी करावी. चालू कायद्या अंतर्गत एकर, यार्ड, फूट आणि इंच यांना मान्यता नाही.
- ग्राहकांनी पॅकेज वस्तू खरेदी करताना पाकिटावर निव्वळ वजन किंवा माप स्पष्ट आणि सुवाच्च अक्षरात सूचित केले की नाही याची खात्री करावी. पॅकेजींगच्या आकारावरून फसवणूक होऊ शकते. चालू कायद्या अंतर्गत सीलबंद पॅकेजवर आत असलेल्या निव्वळ वस्तू चिन्हांकित करणे अनिवार्य आहे.
- ग्राहकांनी लेबलवर लिहिलेले प्रमाण वाचून त्याच्या किंमतीची तुलना केली पाहिजे. अशातर्हे.ने ग्राहक उत्तम रितीने खरेदी-विक्री बाबत चांगला सौदा करू शकतो.
16.ग्राहकांनी पॅकेज वस्तू खरेदी करताना त्या वस्तूवर असलेल्या मूळ किंमतीत छेडछाड केली नाही किंवा पुन्हा लिहिलेली नाही किंवा नवीन वाढीव किंमत असलेले स्टिकर लावलेले नाही हे तपासले पाहिजे.
- ग्राहकांनी कुकींग गॅस खरेदी करताना (LPG) गॅस सिलिंडरवर गॅसचे निव्वळ वजन आणि सिलिंडरचे निव्वळ वजन लिहिलेले आहे आणि सील शाबूत आहे की नाही हे बघितले पाहिजे. ग्राहकाला गॅसच्या वजनाबद्दल शंका आल्यास त्यांनी आपल्या उपस्थितीत पुन्हा वजन करून देण्याचा आग्रह करावा.
- ग्राहक जेव्हा पॅकेज वस्तू खरेदी करतात उदा: सिमेंट, तो/ ती संशय आल्यास त्याच्या/ तिच्या उपस्थितीत पुन्हा वजन करून घेऊ शकतो/ शकते.
- एखाद्या वस्तूची किंमत केवळ त्याच्या दर्जावरूनच नव्हे तर त्याच्या प्रमाणानुसार देखील पारखली जाते. ग्राहकांनी त्यांना त्यांच्या पैशाचा पूर्ण मोबदला मिळत आहे याविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे.
- ग्राहकांनी पॅकेज वस्तू खरेदी करताना प्रत्येक वस्तूंवर खालील माहिती छापील स्वरूपात आहे की नाही याची जाणीव ठेवावी.
- निर्माता/ पॅकरचे नाव आणि पत्ता.
- पॅकेजमध्ये असलेल्या वस्तूंचे व्यापक / सामान्य नाव.
- आत असलेल्या वस्तूंचे वजन, माप किंवा नग जे असेल ते याचे निव्वळ प्रमाण.
- पॅकींग आणि उत्पादन केलेला महिना आणि वर्ष.
- सर्व करांसहीत कमाल विक्री किंमत. (एम.आर.पी.)
- याशिवाय इतर अतिरिक्त माहिती. जसे: ई-मेल, पत्ता, हेल्पलाईन, दूरध्वनी क्रमांक ईत्यादी.
- ग्राहकांनी जेथे शक्य असेल तेथे खरेदीचे बील / कॅश मेमो देण्याचा आग्रह करावा.