मुख्य पान

Department of Legal Metrology, relates to the units of weights and measures, methods of measurements and measuring instruments and the regulatory safeguards to the public.

वैध मापविद्या नियंत्रकाचा मुख्य सिध्दांत

ग्राहकहिताच्या रक्षणासाठी, वेगवेगळे कायदे व अधिनियम अंमलात आणले आहे. मूल्य भरलेल्या वस्तूंचा योग्य वजन व माप जाणून घेणे हा ग्राहकांचा सर्वसामान्य हक्क आहे. ग्राहकाच्या अधिकार राखण्यासाठी कायदा आणि अधिनियमाप्रमाणे वैध मापविद्या विभाग चालू आहे.

वैध मापविद्या विभाग हा सेवाभिमुख सरकारी यंत्रणा आहे. या विभागाने सर्वसामान्य लोकांच्या माहितीसाठी अमंलात आणलेल्या कायदा व अधिनियम त्याचबरोबर विविध परवाने, वेळ मर्यादा आणि तक्ररींचे निवारण या संबंधात संक्षिप्त मार्गदर्शक तत्वे खात्याच्या नागरिक सनदीत दिली गेली आहेत. जर वरील मार्गदर्शक तत्वांबाबत लोकांना जाणीव असेल तर वैध मापविद्या ही जास्त लोकाभिमुख व पारदर्शक होईल. ग्राहक/जन हिताच्या दृष्टीने वैध मापविद्येची प्रतिमा उंचावर नेण्यास मदत होईल असा माझा विश्वास आहे.

नियंत्रक, वैध मापविद्या
गोवा राज्य