भूमिका व जबाबदारी

भूमिका व जबाबदारी

  1. वैध मापविद्या कायदा 2009, गोवा वैध मापविद्या नियम 2011 आणि वैध मापविद्या पॅकेज वस्तू नियम, 2011 याद्वारे कर्तव्ये व जबाबदार्‍या स्पष्ट केल्या आहेत.
  2. 2. कार्यालयीन प्रमुख म्हणून काम करणे.
  3. वैध मापविद्या खात्यातील संपूर्ण गोवा राज्यात कार्यरत असलेले सर्व सहाय्यक नियंत्रकावर,निरीक्षकांवर सर्व कर्मचार्यां वर नियंत्रण ठेवणे.
4.संपूर्ण गोवा राज्यातील कनिष्ठ कर्मचारी, सहाय्यक नियंत्रक,निरीक्षक याच्यांवर देखरेख करणे.
  1. कार्यालयाचे प्रमुख म्हणून वैध मापविद्या खात्याचे प्रशासकीय कामकाज.
  2. वैध मापविद्या (पॅकेज वस्तू) नियम 2011, खाली असलेल्या नियमाअंतर्गत वैध मापविद्या अधिनियम 2009, खाली गुन्ह्यांची छाननी.
  3. माहिती अधिकार अधिनियम 2005, अंतर्गत प्रथम अपील अधिकारी म्हणून काम करणे.
  4. पदसिध्द अवरसचिव म्हणून काम करणे.
  5. योजनांची अंमलबजावणी करणे.
  6. अंदाजपत्राचे नियंत्रण करणारा अधिकारी.
  7. ‘सी’ वर्गासाठी आणि ‘डी’ पदांसाठी अनुशासनिक अधिकारी.
  8. वजन आणि माप तसेच पॅकेज वस्तूंच्या उत्पादक, वितरक आणि दुरुस्ती करण्यांसाठी परवाना अधिकारी.
  1. केंद्रीय प्रयोगशाळेत दुय्यम दर्जा राखणे.
  2. भारत सरकारच्या बेंगलोर/ अहमदाबाद येथील संदर्भात दर्जाच्या प्रयोगशाळेत दुय्यम स्तराचे सत्यापन करून घेणे.
  3. नियंत्रकाने किंवा सरकारच्या अधिकार्‍यांनी सूचित केल्याप्रमाणे उपकरणांमध्ये सहाय्य करणे आणि सर्वेक्षण
करणे.
  1. पर्वरी येथील प्रधान कार्यालयात दक्षता अधिकारी म्हणून काम करणे.
  2. पर्वरी येथील प्रधान कार्यालयात सार्वजनिक तक्रार अधिकारी म्हणून काम करणे.
  3. वैध मापविद्या खात्यात अभिकरण अधिकारी म्हणून काम करणे.
  4. वैध मापविद्या, नियंत्रक कार्यालयातील आस्थापन कर्मचार्यांकसाठी रेखांकन व वितरण अधिकारी म्हणून काम करणे तसेच निरीक्षक युनिट्स आणि सहाय्यक नियंत्रकांचे कार्यालय तपासणे, गरज असेल तेव्हा हिशेबासाठी लेखा संबंधी बाबी आणि रिकोर्ड तयार करणे.
  5. जर त्याला नियंत्रकाने तसे करण्यास अधिकृत केले तर जी.एम.एफ.सी न्यायालयात ए.पी.पी म्हणून फिर्यादी खटला लढविणे.
  6. कामाच्या दर्जाचे दुय्यम दर्जाबरोबर वैधानिक सत्यापिताची व्यवस्था करणे आणि सत्यापन प्रमाणपत्र जारी करणे.
  7. नियंत्रकाच्या दैनंदिन कार्य आणि कर्तव्यांमध्ये सहाय्य करणे.
  8. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सहाय्य नियंत्रकाच्या कार्यालयाची तसेच सर्व निरीक्षक युनिट्सची एकूण देखरेख करणे.
  9. गरज असेल तेव्हा वैध मापविद्येच्या नियंत्रकाने अधिकृत केलेले कार्ये व कर्तव्ये हाती घेणे.
  10. माहिती अधिकार अधिनियम 2005, अंतर्गत सार्वजनिक माहिती अधिकारी म्हणून काम करणे.
  11. लोकसंपर्क अधिकारी म्हणून काम करणे.
  12. विविध संस्थांमध्ये ग्राहक जागृती कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  13. नेल्स आणि स्टेम्पिंग उपकरणांचे प्रभारी म्हणून काम करणे आणि त्याचे वैध मापविद्या, सहाय्यक नियंत्रक आणि निरीक्षकांना वितरण करणे.
  14. ई-शासन, निवडणूक प्रक्रिया, दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली इत्यादींमध्ये अभिकरण अधिकारी म्हणून काम करणे.
त्याच्या कार्यकक्षेखाली निरीक्षक युनिटच्या कामाची देखरेख करणे.
  1. कॅशबुकच्या देखभालीच्या संदर्भात, आंतरिक हिशेब तपासणे आणि नियंत्रकांना, वैध मापविद्या यांना अहवाल देण्यासाठी निरीक्षक युनिट्सचे निरीक्षण करणे.
  2. निरीक्षक युनिट्सकडून मिळालेले विवरण पत्र आणि अहवालांची छाननी करणे आणि नियंत्रकाकडे ती एकत्रित करून त्याचा अहवाल सादर करणे.
  3. कामाच्या दर्जांची आणि इतर उपकरणांची देखरेख आणि निरीक्षण करणे आणि चुकीच्या दुरुस्तीसाठी त्याची व्यवस्था करणे.
  4. केंद्रीय प्रयोगशाळेत दुय्यम दर्जासहीत कामाच्या दर्जांचे वैधानिक सत्यापन करण्याची व्यवस्था करून सत्यापनाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे.
  5. आपल्या जिल्हा कार्यकक्षात दक्षता अधिकारी म्हणून काम करत असताना सर्व निरीक्षक युनिट्सच्या सत्यापनाच्या कामाची आणि निरीक्षक दौर्‍याची तपासणी करणे. निरीक्षकाने सत्यापन केलेल्या वजन व मापचे 5% सेंपल चेक हाती घेणे.
  6. त्याच्या कार्यकक्षात सार्वजनिक तक्रार अधिकारी म्हणून काम करून सार्वजनिक तक्रारी सोडविणे.
  7. आठवड्याच्या बाजारात आणि मार्केटमध्ये धाड आणि संयुक्त धाड घालणे.
  8. पॅकेज वस्तू नियमाखाली पॅकींग युनिट्सचे, कारखान्यांचे आणि उद्योगाचे निरीक्षण करणे.
  9. सर्व निरीक्षक युनिट्सना कायदे आणि नियमांच्या तरतूदींबाबत तसेच निरीक्षणाबाबत मार्गदर्शन करणे आणि गरज असेल तेव्हा आकस्मिक भेट देणे.
  10. आवाराचे निरीक्षण करणे आणि दुरूस्ती करणार्यां ना, वितरकांना आणि उत्पादकांना परवाना जारी करण्यासाठी चाचणी घेण्याची शिफारस करणे.
  11. त्यांच्या संबंधित कार्यकक्षात निर्माता, विक्री, वजन आणि माप साठा इत्यादी तपासणे आणि निर्माता, दुरुस्ती करणार्यांरच्या तसेच वितरकांच्या रेकॉर्ड्सचे वेळोवेळी निरीक्षण करणे.
  12. जर नियंत्रकाने त्याला असे करण्यास अधिकृत केले तर जे.एम.एफ.सी न्यायालयात ए.पी.पी फिर्यादी खटला लढविणे.
  13. वैध मापविद्या, नियंत्रकाने अधिकृत केलेले इतर कार्य किंवा कर्तव्य हाती घेणे.
  14. वजन काटा, डिस्पेंसिंग पंपच्या कामाचे सत्यापन आणि निरीक्षण करणे.
 
  1. 1. त्यांच्या कार्यालयाला जोडून असलेल्या कार्य प्रमाण प्रयोगशाळेची आणि इतर उपकरणांची जसे: शिक्के आणि ठस्यांची देखभाल करणे.
  2. व्यापार्‍यांना त्यांच्या वजन आणि मापांची वेळेत तपासणी करण्यासाठी सूचना जारी करणे.
3.आपल्या कार्यालयात दरदिवशी २० व्यापार्र्यांना बोलावून आपल्या काम दर्जेप्रमाणे आणि प्रयोगशाळांच्या सहाय्यक   आणि हस्तकाम सहाय्यकांच्या मदतीने व्यावसायिक वजन आणि मापांची प्रत्यक्ष तपासणी करून घेणे.
  1. प्रयोगशाळेच्या सहाय्यक आणि हस्तकाम सहाय्यकाच्या मदतीने चाचणीसाठी वजन आणि माप तयार करून घेणे.
  2. व्यापार आवारातील पॅकेज वस्तू आणि वजन किंवा मापांचे वेळोवेळी आणि आकस्मिक निरीक्षण करणे तसेच प्रयोगशाळा सहाय्यक, हस्तकाम सहाय्यक/क्षेत्र सहाय्यकांच्या मदतीने बाजारांचे निरीक्षण करणे आणि संयुक्त धाड घालणे.
  3. वजन व माप, वस्तू, दस्तऐवज आणि पॅकिंग वस्तू बाबतीत गुन्हा दाखल केला असल्यास तो जप्त करणे, जर त्या वस्तू अमुद्रांकीत, सदोष, खालच्या दर्जाच्या ज्या फसवणूकीच्या व्यापारात वापर करतात अशा आणि इतर.
  4. नियंत्रकाच्या मंजूरीने न्यायालयात तक्रार दाखल करणे आणि न्यायालयीन कामकाजात ए.पी.पी ला सहाय्य करणे.
  5. आगामी तात्पुरता दौर्या्चा कार्यक्रम तयार करून सहाय्यक नियंत्रकाकडून मंजूरी घेऊन त्यानुसार कृती करणे.
  6. टॅक्सी/ऑटो रिक्षांचे भाडे मीटर मोजणे.
  7. गरज असेल तेव्हा नियंत्रकाने अधिकृत केलेली अशी कार्ये आणि कर्तव्ये हाती घेणे.
  8. ग्राहक जागृती कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  9. लांबच्या ठिकाणी सत्यापन करण्यासाठी आणि मुंद्रकित करण्यासाठी शिबीरांचे आयोजन करणे.
  10. फिर्यादी खटले, महिन्यांचे अहवाल तयार करून वेळेत ते वरिष्ठ अधिकार्यांरकडे नियमितपणे देणे.